मंगळवार, ८ मार्च, २०११

नामस्मरण आणि वारकरी

वारकरी विठ्ठलाचा जयघोष करतात. त्याचे तल्लिनतेने नामस्मरण करतात.
नामस्मरण वाढल्यावर, पौणिर्मेपासून चंदाचं बिंब हळूहळू कमी होतं आणि जसं अमावस्येला दिसेनासं होतं, तसा वासनाक्षय होतो. प्रपंचात चिंता असते, परमार्थात चिंतन असते. चिंता धगधगत्या चितेकडे घेऊन जाते पण चिंतन चिरंतन परमात्म्याकडे नेते. आषाढातली वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या निष्पाप मनाची सरलता त्यांच्या ठिकाणी धर्माने वागायची प्रवृत्ती निर्माण करते. ती समाधी अवस्थेला
नेते. मनाची शून्यता
येते. हे शून्य मन म्हणजेच मोक्ष होय. वारकरी हा मोक्ष, श्रीहरींवरच्या असीम प्रेमाने मिळवतात. देहप्रेमी अशांत असतो
पण हे वारकरी आत्मप्रेमी प्रसन्न असतात. ते
फक्त
प्रार्थनाच करतात
, याचना नाही. चिंचेचं नाव घेतल्यावर तोंडाला पाणी सुटतं तसं वारकऱ्यांच्या
टाळ-मृदुंगाच्या साथीने चाललेल्या भजनाने पापाला घाम फुटतो. त्याग
, सेवा
आणि प्रेम या त्रिवेणी संगमाने श्रीहरींच्या भक्तांनी पंढरीचं तीर्थक्षेत्र
बनवलं
आहे. पाण्यामुळेच चिखल होतो पण पाणीच चिखलाला साफ करतं
, तसं
मनाच्या
वासनांमुळे आम्ही प्रपंचपंकात अडकलो होतो पण हे मनच आता
त्यातून बाहेर काढणार आहे
हे जाणून श्रीहरींचं भक्त मन विठूरायाच्या चरणी वाहतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: