मित्रांनो.... आपण संसारात रमतो, पैसा कमवतो. आपल्याला असे वाटते की, पैशाच्या बळावर आपण काहीही करु शकतो.. कोणालाही विकत घेऊ शकतो... पण तो आपला व्यर्थ अहंकार असतो... मग असेच दिवस सरत जातात व आपण काळाकडे ओढला जातो.. बालपण संपुन तरुणपण कधी येऊन गेले ते कळत नाही.. म्हातारपण आल्यावर मात्र आपल्याला मृत्युची भीती वाटु लागते... मृत्यु आपल्याला नको असतो... मनातल्या अनेक इच्छा अपुर्ण असतात.. त्या आपल्याला पुर्ण करायच्या असतात.. ययाति राजाची गोष्ट सर्वांना माहिती असेलच.. तरुणपणाच्या इच्छा भोगण्यासाठी त्याने आपले म्हातारपण त्याच्या तरुण मुलाला दिले व त्याचे तरुणपण त्याने घेतले... तरीही तो अतृप्तच राहिला... असेच आपले होते... मग मृत्युची घरघर सुरु होते.. काळ आपल्या दरवाज्यात येऊन उभा रहातो... त्यावेळी आपली स्थिति ही अत्यंत केविलवाणी होते... त्यातुन वाचण्यासाठी तो प्रत्येकाकडे आशाळभुत नजरेने पहात असतो.. कधी कोणीतरी आपल्याला वाचविल असे त्याला वाटते... मृत्युची पकड आणखीनच घट्ट होते.. मग त्याची वाचा जाते... तोंडाने तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो.. पण कोणालाच त्याची भाषा समजत नाही... नंतर त्याची दृष्टी जाते... सारे नातलग जवळ असुनही त्याला या भयानक मृत्युच्या तडाख्यातुन कोणीही सोडवु शकत नाही... सारे चित्र भयावह असेच असते... जी पत्नी त्याच्यासोबत जीवनभर साथ देते ती पण त्याला या मृत्युच्या तावडीतुन सोडवु शकत नाही... संत तुकोबाराय त्यांच्या अभंगात सांगतात तो अभंग वाचतांना मन खरोखरच सुन्न होते... भगवंताची भक्ति सर्वश्रेष्ठ का आहे ते कळुन येते व त्याचप्रमाणे संसाराचे मिथ्यत्व कळुन येते..
नको नको मना गुंतु मायाजळी।
काळ आला जवळी ग्रासावया।।
काळाची ही उडी पडेल बा जेव्हा।
सोडविना तेंव्हा मायबाप।।
सोडविना तुला देशीचा चौधरी।
आणिक सोयरी भली भली।।
सोडविना तुला पाठीची बहिण।
शेजेची कामिन दुर होय।।
तुका म्हणे तुला सोडविना कोणी।
एका चक्रपाणी वाचुनीया।।
खरचं आहे.. या भयानक मृत्युपासुन आपल्याला आपले धनगोत पैसा अडका, यापैकी कोणीही सोडवु शकत नाही.. आपल्याला यातुन सोडवणारा एकच आहे.. तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण, पांडुरंग...
मित्रांनो, खरोखर अजुनही वेळ गेली नाही.. भगवंताची सेवा करा.. त्याचे नामस्मरण करा.. तोच आपल्या तरणारा आहे... श्रीहरी... श्रीहरी..