आकाश हे ज्याप्रमाणे सर्वजीवांना एकच एक असते, तसेच सद्गुरु सर्व जीवांना एकच एक असतात. त्यांचा सांप्रदाय भिन्न असो, त्यांची साधना भिन्न असो, पण त्यांची ज्ञानाची पातळी एकचअसते. जीवन्मुक्तावस्था ही साऱ्यांत एकच असते. त्यांना एकाच प्रकारचे आत्मदर्शनघडत असते. त्यांची ब्रह्मदृष्टी एकच असते. आपण मात्र त्यांच्यात अज्ञानाने भेदभावकरतो. माझा गुरु एक व तुमचा गुरु दुसरा असा भेद करुन आपण मात्र आत्मस्वरुपावरुन घसरतो.
गुरु बद्दलची विश्वव्यापक दृष्टी
मित्रांनो आपण सद्गुरुंना ठराविक चौकटीत डांबुन ठेवतो. त्यांना देहधारी मानुन त्यांचे श्रेष्ठपण त्यातच समजण्यात आपण चुक करतो. जे भाग्यवान गुरुपदाला पोचलेले असतात त्यांचा आत्मा हा विराडात्मा, विश्वात्मा बनलेला असतो. आपल्या डोळ्यांना त्यांचा देह जरी दिसत असला तरी ते अतिवाहक देहानेच अमर असतात. त्यांचा चराचरात वास असतो. अशा विश्वव्यापक सद्गुरुंना नमस्कार विश्वव्यापकत्वच करावा.
ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे।
त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे।
मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी।
सद्गुरु तुझे पाय दोन्ही।।
हे सद्गुरो! माझे मन ज्या ज्या ठिकाणी जाईल, ( मनात जे जे विचार येतील, माझी दृष्टी जिकडे जाईल, किंवा जे जे दृश्य डोळ्यांनी पाहील) त्या साऱ्या ठिकाणी तुमचेच निजरुप आहे. व माझे मस्तक मी ज्या ज्या ठिकाणी ठेवील त्या त्या ठिकाणी तुमचेच पवित्र चरण असतील.
....डी सिताराम