शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

एक मजेदार साधना....

ही साधना वाटते तितकी सोपी नाही.. कारण तुम्ही मध्येच थांबलात तर पहिल्यापासुन ही साधना करावी लागते... ह्या साधनेने मन हे सुक्ष्म होते.. व स्मरणशक्तीचा अद्भुत विकास होतो...

साधना अशी..

साधकाने खुर्चीवर बसावे.. हातात कागद व पेन घेऊन साधनेला सुरुवात करावी, मोठ्याने उच्चार करत शंभर पासुन उलट अंक मोजत एक पर्यंत यावे व प्रत्येक अंकासोबत कागदावर एक पासुन शंभर पर्यंत अंक लिहित जावे... म्हणजे तुम्ही शंभर बोललात तर कागदावर एक लिहावा... याप्रमाणे... जर मध्येच अडखळलात तर परत पहिल्यापासुन सुरुवात करावी...

काही वेळेस उतरत्या क्रमाने सम अंक म्हणावेत व कागदावर चढत्या क्रमाने सम अंक लिहित जावे... या साधनेने मन हे खुपच सुक्ष्म होते व एकावेळेस अनेक गोष्टी चांगल्या रितिने धारण करण्याची अद्भुत शक्ति येते... मी या शक्तिचा प्रयोग पाहिला आहे... पुण्याला गांधर्व विद्यालयात पंडित सुरेश तळवलकरांचे वादन होते.. त्यांनी एक ताल वादनासाठी निवडला... तोंडाने ते दुसराच ताल म्हणत होते व त्यावर कळस म्हणजे लेहेरा हा दुसऱ्याच तालासाठी होता... सारे प्रेक्षक श्वास रोखुन होते... पण जेव्हा सर्व गोष्टी या समेवर आल्यात त्या वेळी झालेला टाळ्यांचा कडकडाट मी विसरु शकत नाही... अशी अद्भुत शक्ती त्यांच्याजवळ कशी आली होती.... हे मन अतिशय सुक्ष्म करण्याचा परिणाम आहे....

दुसरे उदाहरण माझ्या कॉलेज जीवनातील... एक प्रोफेसर कोणाचेही नाव एकदाच ऐकल्यावर त्यास कधीही नावाने हाक मारत असत... काही वर्षांनी सुद्धा...

तिसरे उदाहरण स्वामी विवेकानंदांचे... अर्थात् सर्वांना माहिती असेलच... स्वामीजी परदेशात असतांना त्यांचा एक सेवक लायब्ररीतुन दररोज एक पुस्तक घऊन जात असे व सायंकाळी ते परत करत असे.. लायब्ररीमनला वाटले की, स्वामीजी पुस्तके काहीच वाचत नसावेत... तसे त्यांनी स्वामीजींना विचारले देखील... त्यावर स्वामीजींनी मागील आठवड्यात वाचलेल्या पुस्तकाचे पान त्यास उघडावयास सांगुन त्यांनी त्या पुस्तकातील उतारेच्या उतारे म्हणुन दाखवले, व इतकेच नाही तर कोणता उतारा कोणत्या पानावर आहे असेही त्यांनी सांगितले... नंतर मात्र तो लायब्रियन स्वामींचा पक्का शिष्य बनला हे सांगावयास नको... हा आहे स्मरणशक्तिचा अद्भुत विलास... ब्रह्मचर्य व साधनांद्वारे बुद्धिचा, स्मरणशक्तीचा असा विकास होतो हे आवर्जुन सांगावयास पाहिजे...

वरील साधना पण अशीच आहे... अर्थात् ही सुरुवातीची प्रायमरी साधना आहे... पण याद्वारे स्मरणशक्तीचा अद्भुत विकास होतो.  मात्र नक्की...
        ....डीसिताराम