बुधवार, २१ सप्टेंबर, २०११

जीवन्मुक्त पुरुषाची लक्षणे-

एक- जो परमार्थदृष्या विश्व आकाशाप्रमाणे मिथ्या मानतो,
दोन- जागृत असुनही व्यवहार करत असतांना जो गाढ निजलेल्या मनुष्या प्रमाणे निर्विकार असतो,
तीन- ज्याचे, सुखाने चेहऱ्यावरील तेज वाढत नाही किंवा दुःखाने चेहऱ्यावरील तेज लोपत नाही व प्राप्त स्थितिमध्ये जो निर्विकार असतो,
चार- जो सुषुप्तिमध्येही जागृत असतो आणि जागृतीचा त्याला गंधही नसतो...ज्ञानी असुनही वासनारहित असतो,
पाच- ज्याचा अहंकार हा सर्वस्वी निमाला असुन त्रिभुवनाची उत्पत्ती आणि लय जो आपल्या आत्मस्वरुपामध्ये आपल्या डोळ्यांच्या उघडझापी प्रमाणे आहेत असे जो पाहतो तो जीवन्मुक्त समजावा..
सहा- ज्याला लोक भीत नाहीत आणि जो लोकांना भीत नाही, जो हर्ष, रागादि विकारांपासुन मुक्त आहे व जो सचित्त असुनही चित्तरहित आहे असा महापुरुष जीवन्मुक्त होय...

      ... डीसिताराम