अंतर्मन हे सर्वव्यापी आहे. हे यापुर्वी सांगितलेच आहे. काहीजण याला Cosmic Electricity ( विश्वव्यापी विद्दुतशक्ती ) असेही म्हणतात.. अंतर्मन पुर्ण जागृत झाले तर ते सर्व फळ देण्यास समर्थ होते. असा योगी जगतावर अप्रतिहत सत्ता गाजवु शकतो... त्याची कुंडलिनि शक्ति जागृत झालेली असते... तो दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखु शकतो.. किंवा आपले विचार दुसऱ्या व्यक्तित संक्रमण करु शकतो.. त्याच्या दिव्य चक्षुस दुरवरचे दिसु शकते... भुत-भविष्याचे त्याला ज्ञान होते... हस्तस्पर्शाने तो दुसऱ्या व्यक्तिस आनंदित करु शकतो.. अथवा त्यास दिव्यज्ञान देऊ शकतो...व त्याच्या मनात ईश्वरीय तत्व भरु शकतो...
अशा श्रेष्ठ क्रियेस योगशास्रात शक्तिपात असे म्हटले आहे... माझे सद्गुरु ब्रह्मलिन श्रीपाद बाबा हे असेच शक्तिपाताचे स्रोत होते... अध्यात्मिक अनुभुति ते तात्काळ ते शिष्याच्या ह्रदयात संक्रमित करीत असत.. नंतर हा शिष्य संशय रहित होऊन जात असे...त्यांचे अंतर्मन पुर्णपणे जागृत झालेले होते... ते विश्वस्वप्नातुन पुर्णपणे जागृत झालेले होते..त्यांनी दुसऱ्यांच्या संपत्तीवर कधीच डोळा ठेवला नाही..किंवा, शिष्यांकडुन पैसा गोळा करुन ट्रस्टही उभारला नाही.. ते साक्षात फिरती ज्ञानगंगा होते... त्यांच्या पश्चात त्यांच्या गादीवर महाड येथील कातिवडे ( बिरवाडी ) येथील सद्गुरु नारायण महाराज गायकवाड ह्यांनी अध्यात्मिक धुरा सांभाळली....ह्यांची ज्ञान पातळी अतिशय उच्चपातळीची होती...अशा जीवन्मुक्तांच्या सहवासात मला दीर्घकाळ रहावयास मिळाले हे माझे परम भाग्यच होय...त्यांच्या चरणांशी बसुन मला ज्ञानामृत प्राशन करायला मिळाले... त्यांच्या कृपेने मला क्षणभर का होईना जीवन्मुक्तिचा अनुभव आला.. व अंतर्मन जागृतीचा अनुभव घेतला.. असा अनुभव सर्वांनाच मिळावा अशी माझ्या मनाची तळमळ आहे... त्यासाठी ही उठाठेव आहे... दररोजचे कामकाज सांभाळत असतांना वेळ मिळेल तेव्हा रोज थोडेतरी लिहावे, असा संकल्प मनाशी धरुन आहे...त्यासाठी फेसबुकचे माध्यमाचा आधार घेतला आहे... हे अनुभव सिद्ध ज्ञान सर्वांनाच मिळावे अशी माझी मनिषा आहे....असो...
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई तसेच.. नामदेव, तुकाराम, एकनाथ, गोरा कुंभार, सावता माळी, जनाबाई यांसारखी संत मंडळी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे भुषणच होत... त्यांच्या भक्तियोगाने अध्यात्मिक शक्ति इतकी उंचावली होता की, ते या विश्वस्वप्नातुन जागे झाले होते....जीवन्मुक्त बनले होते.. त्यांच्या अंतर्मनावर त्यांचा पुर्ण ताबा होता.. त्यांची या विश्वावर अप्रतिहत सत्ता चालत होती...त्यांच्या हातुन त्यांना नकळत काही चमत्कारही झाले..पण त्यांचा अहंपणा किंवा, प्रसिद्धिचा हेतू नव्हता... प्रत्येक प्राणिमात्रांबद्दल त्यांच्या मनात कळकळ होती..त्यांचे मन विश्वाशी एकरुप झाले होते.... अशा जीवन्मुक्त संतांना माझे कोटी कोटी प्रणाम...असो...
आता पर्यंत आपण अंतर्मनाच्या प्रांगणात उभे राहुन त्याचा थोडासा अभ्यास केला....त्यास जाणुन घेण्याचा प्रयत्न केला...आता प्रत्यक्ष अंतर्मनाचेच द्वार उघडुन त्यात प्रवेश करायचा आहे...
माझे मित्र हे सात्विक विचाराचे असल्यामुळे त्यांना काही अनुभव सिद्ध साधना सांगाव्यात की ज्यायोगे त्यांचेही अंतर्मन हे क्षणभर का होईना जागृत व्हायला पाहिजे...असे माझ्या मनास वाटत आहे...अंतर्मन जागृतीचे अनेक उपाय विविध ग्रंथांमधुन सांगण्यात आले आहे...पण मी ज्या काही सांगणार आहे त्या साध्या, सोप्या, सहज करतो येण्याजोग्य व अनुभव सिद्ध अशाच आहेत... काही साधना गुरुकृपेने प्राप्त झाल्या आहेत... त्या पैकी माझ्या मित्रांनी एखादी साधना नियमित करुन स्वतःचे कल्याण करुन घ्यावे व दिव्य आनंदाचा लाभ घ्यावा...साधनेने अंतर्मनाचा स्पर्श झाल्याशिवाय रहाणार नाही. असे झाले तर त्यांचे सर्व जीवन मंगल तेजस्वी व आनंदमय झाल्याशिवाय रहाणार नाही.. अंतर्मनाची शक्ति अशा साधकाचे ऐहिक व पारमार्थिक कल्याणच करते....हे मी माझ्या स्वानुभवाने सांगतो............ श्रीहरी.. श्रीहरी,,,( क्रमशः )