मंगळवार, ८ मार्च, २०११

क्षण

क्षण संपला, तास संपले, संपला तो दिस
नाही कळले, मना वळले, मनी उरला भास
आठवणींची गर्दी उसळली, मना मिळे ना शांती
परि पाहता मन रतले, नयनी बसली मुर्ती
सजग उल्लास परि जाहला, तुष्टले हे मन
आठवणींचे मेघ वितळे, ना उरे अभिमान
मन रिते हे उगाच जाहले, हुरहुरली काया
आप्त-स्वकिय, गोत्र-सगोत्र, कसे गेले विलया
नाही उरला हेवा कशाचा, नाही उरली आस
मला वाटते, स्थिती बरी ही, रहावी रात्रंदिवस
हेचि मागणे मागे प्रभुशी, तुम्ही द्यावी साथ
ऐकुनी वाटे, हळुच हासे, माझा पंढरीनाथ

....डी सिताराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: