मंगळवार, ८ मार्च, २०११

व्दंव्द एक काव्य

मनी व्दंव्द चाले, धर्म- अधर्माचे
पाप- पुण्याचे, उन सावलीचे
शुभ्र वासनेचे, कु-वासनेचे
नीति -अनीतिचे, सत्य -असत्याचे
मनी व्दंव्द चाले, चल- अचलाचे
व्यक्त -अव्यक्ताचे, गुढ- प्रागट्याचे
स्वप्न- जागृतीचे, देव- दानवाचे
राम- रावणाचे, माया- ममतेचे
मनी व्दंव्द चाले, तेज -काळोखाचे
काम- वासनेचे, चढ -उताराचे
भाग्य- दुर्भाग्याचे, दीन -दुबळ्यांचे
हीन- श्रेष्ठतेचे, सान -प्रतिष्ठेचे
मनी व्दंव्द जाई, गुरुकृपा होई
जळे काम भोग, आत्मज्ञान होई
नसे अन्य काही, चित्तामधे राही
डोळे स्थिरावती, विठ्ठलाच्या पायी

.........डी सिताराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: