मंगळवार, ८ मार्च, २०११

शांभवी

शांभवी एका मुद्रेचे नाव आहे, की जी मुद्रा भगवान  शंकरांना प्रिय होती.सदैव अशा मुद्रेत भगवान शंकर बसत.ही मुद्रा जगाचे मायिकत्व दाखवते.जगात व्यवहार करीत असतांना जगात स्वप्नवत भावनेने व्यवहार केल्यास संसारातील दाहकता जास्त प्रमाणात भासत नाही.संसार आसक्तीरहित असा होतो.मोह,माया,ममता,काम-वासना हे सर्व मानसिक विकार आहेत,त्यावर नियंत्रण मिळवल्यास मानसिक समाधान उंचावते.संसारातील भिषणता मनाला जाणवत नाही.त्यावेळी मन हळुहळु एका उच्चस्तरांत प्रवेश करु लागते,त्यावेळी जी आपल्या मनाची मुद्रा तयार होते ती शांभवी मुद्रा.आपणा सर्वांना त्या मुद्रेचा काही प्रमाणात का होईना अनुभव घ्यायचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: