नेपाळ : नेपाळमधील गणपती हा नृत्यगणपती असून तो लाल रंगाचा आहे. या नृत्यगणपतीभोवती चार विनायक असतात. रक्तविनायक, चंद्रविनायक, सिद्धिविनायक व अशोक विनायक अशा पंच विनायक गणपतींचे एक देऊळ आहे. त्याशिवाय काठमांडूमध्ये काही गणेश मंदिरे आहेत. िझपी, ताडदू, चंगनारायण, सिद्धिविनायकाचे थानकोट अशा नावांची ही गणपती मंदिरे आहेत. नेपाळमध्ये गणेशाच्या मूर्तीत हेरंब गणपती अत्यंत लोकप्रिय आहे. या मूर्तीला नेहमी पाच मस्तके असलेली दिसतात. नृत्यमुद्रेतील काही गणेशमूर्तीच्या मस्तकावर शेषाने फणा उभारलेला दिसतो.
म्यानमार (ब्रह्मदेश) : म्यानमारच्या सखल भागातील सुपीक प्रदेशात मोन लोक राहत होते. ते हीनयानी बौद्ध होते. देवदेवतांचे ते कट्टर शत्रू होते. त्यामुळे येथे प्राचीन बौद्ध मंदिराचे रक्षक म्हणून गणेशासह अनेक देवतांची स्थापना केलेली दिसते. येथील व्यापारी जनसमुदायात गणपती हा विघ्नहर्ता म्हणून विशेष प्रिय होता. हे तिथे सापडलेल्या असंख्य लहान लहान गणेशमूर्तीवरून लक्षात येते. त्याला येथे महापियेन असे म्हणत. येथील गणेशमूर्ती ओबडधोबड आहेत.
कंबोडिया (इंडोचयना) : कंबोडियात गणपतीला प्रह कनेस म्हणतात. तो कोठेही तुंदिलतनू दाखविलेला नाही. याशिवाय कंडल येथील एका खासगी वस्तुसंग्रहालयात चार मस्तकांचा गणपती आहे. ही चार मस्तके चार मुख्य दिशांकडे तोंड करून
आहेत. चारही मस्तकांवर मिळून एकच मुकुट आहे.
जपान : येथे दोन गजमुखी देवता एकमेकांच्या खांद्यावर माना टाकून एकमेकांना हातांनी विळखा घालून भेटतात. या दोन्ही मूर्तीच्या अंगावर पायघोळ झगे घातलेले आहेत. अशा पद्धतीची मूर्ती कोठेही पाहायला मिळत नाही. गणेशाच्या या स्वरूपाचे साम्य जपानमधील निओ या देवतेच्या स्वरूपाशी मिळतेजुळते आहे. याशिवाय कांति-तेन हे खाल जपानी गणेशाचे स्वरूप अनेक योगिक तांत्रिक कल्पनांचा समावेश करून बनविले असावे.
थायलंड (सयाम) : गणेश देवता ही वैदिकांइतकीच बौद्धांनाही प्रिय होती. बँकॉक येथील िहदू मंदिरांत पंचधातूंची गणेशाची वैशिष्टय़पूर्ण मूर्ती आहे. हनोईमधील ग्रंथालयात एक जुनी पोथी आहे. तिच्यात गणपतीची सहा चित्रे आहेत. त्यापकी एक मूर्ती अति विलक्षण आहे. त्या गणपतीचे नाव कोंचनानेश्वर असून मुकुटधारी आहे. त्याला तीन मस्तके आणि सहा हात आहेत. अगदी वरच्या हातात लहानसा हत्ती धरला आहे. त्या हत्तीला असंख्य डोकी आहेत. खालच्या उजव्या हातात शंख
आहे.
मेक्सिको (दक्षिण अमेरिका) : अमेरिकेतील रेड इंडियन लोक व मेक्सिकोमधील लोक आजही गजमस्तक व मनुष्यदेह असलेल्या मूर्तीची पूजा करतात. एॅझटेक या संस्कृतीतील पूजनीय देवतेचे गणेशाशी पुष्कळ साम्य आहे. ग्रीक पुराणात जॅनस नावाची बुद्धिदेवता आहे. ती गजमुखी किंवा दोन तोंडांची आहे. जॅनस देवदेवतेची कोणत्याही कार्याच्या प्रारंभी पूजा केली जाते.
फ्रान्स : रेयुनियन बेटावर सेंट बेनॉइट या मंदिरात एक गणेशमूर्ती आहे. ही मूर्ती पांढऱ्या वस्त्रात असून तिला फुलांच्या माळा घातलेल्या असतात.
चीन : चीनमध्ये दोन ठिकाणी गणेशाच्या प्राचीन प्रतिमा आढळतात. तुन हॉग येथील लेण्यांच्या िभतीवर कोरलेली एक आणि दुसरी कुग हिस्वेन येथील खडकापासून तयार केलेली आहे. बौद्ध संस्कृतीबरोबर चीनमध्ये गणेशाचे आगमन झाल्याचे मानले जाते. तुन हॉग येथील गणेश मूर्तीच्या डोक्यावर मुकुट नसून लाल रंगाची कुऱ्हाड आहे. या
मूर्तीसमवेत चंद्र, सूर्य आणि नवग्रहांच्या प्रतिमा आहेत. कुंग हिस्वेनमधील मूर्तीच्या उजव्या हातात कमळ असून डाव्या हातात चिंतामणी आहे. चीनमध्ये गणेशाची उपासना केली जात होती याचे अनेक पुरावे आजही सापडतात.
न्यूयॉर्क : द िहदू टेंपल ऑफ नॉर्थ अमेरिकेच्या संस्थेचे श्री महावल्लभ गणपती मंदिर आहे. ते न्यूयॉर्कच्या फ्लिशग भागात आहे. िहदू शिल्पशास्त्राप्रमाणे अमेरिकेत बांधलेले सर्वात मोठे अधिकृत मंदिर आहे. येथे रजत सिंहासनावर बसलेली काळ्या पाषाणातून कोरून काढलेली गणपतीची भव्य मूर्ती आहे. या मंदिरात शिवपार्वती, व्यंकटेश्वर, महालक्ष्मी, राम-सीता, हनुमान, कृष्ण देवतांची मंदिरे आहेत. त्यांची सोन्याचांदीची आभूषणे जगात सर्वोत्कृष्ट आहेत.
संदर्भ : श्रीगणेश कोश

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा