मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

एक प्रभावी साधना...

मित्रांनो, ही एक प्रभावी अशी साधना आहे.... या साधनेने केवळ अंतर्मनच जागृत होत नाही तर मन हे अति सुक्ष्म असे होते.... प्रत्येकाने करावी अशी ही साधना आहे.... आस्तिक असो वा नास्तिक, काहीच हरकत नाही... पण ही साधना केल्याने मनाचा विकास होतो.... मन हे अतिशय सुक्ष्म झाल्यामुळे त्यास कठिणातला कठिण विषय सहजच आकलन होतो..... स्मरण शक्तिचा विकास होतो.... अध्यात्मिक भाषेत सांगावयाचे झाल्यास मेधाशक्ति विकसित पावते..... जर ही साधना दीर्घकाळ केली तर स्मरणशक्तीचा अद्भुत असा विकास होतो.... मनाचे साधे साधे संकल्प पुर्ण होतात.....चेहऱ्यावर एक प्रकारची आभा झळकते...... अशा व्यक्तिकडे एक प्रकारचे चुंबकत्व तयार होऊन ती व्यक्ति जीवनात यशस्वी होते.....तरुणांनी केल्यास त्यांच्या आत्मशक्तिचा विकास होऊन त्यांच्यात वास करत असलेले गुण हे विकसित पावतील....अवगुण हे नष्ट होऊ लागतील.... मन हे बलवान होईल.... त्यांना कोठलाही अवघड विषय समजल्यामुळे त्यांचा बुद्धिचा विकास होईल....
प्रथम देवाजवळ धुप किंवा अगरबत्ती लावावी व साधकाने सुखासनात बसावे. डोळे बंद करुन घ्यावे व मोठ्या आत्मविश्वासाने या साधनेस सुरुवात करावी...या साधनेत मंत्र वगैरे म्हणण्याची वा प्राणायाम करण्याची काहीच गरज नाही..... श्वासोश्वास मंद ठेवावा...मनातील भुतकाळ वा भविष्य काळातील विचार दुर ठेवावे... मनास वर्तमानकाळात गुंतवुन ठेवा... प्रथम हे अवघड वाटेल... कारण आपल्या मनास वर्तमानात ठेवण्यास कधीच वळण लावलेले नाही... त्यामुळे थोडे कठिण जाईल....असो... श्वासोश्वास मंद झालेला आहे.... आता श्वास घेतांना मन त्या श्वासाबरोबर आत जाऊ द्या.... आपला श्वास शरीरात कोठपर्यंत जातो ते पाहा.....आपला श्वास खोलवर जात नसल्याचा आपल्याला अनुभव येईल... याचा अर्थ आपण आतापर्यंत अपुर्ण श्वास घेत आलेलो आहोत.... मित्रांनो.... या अपुर्ण श्वासामुळे आपल्या फुफ्फुसातील अब्जावधी कोश निष्क्रिय अवस्थेत असतात.... त्यामुळे दमा, खोकला, सर्दी, शिंका यांसारखे श्वासाच्या निगडित असणारे रोगांची आपण शिकार होत असतो.
श्वास सोडा व त्याबरोबर मनाला पण श्वासाच्या बरोबर बाहेर येऊ द्या..... परत सावकाश श्वास घ्या व मनाला पण आत येऊ द्या..... आता मात्र श्वास हा शरीरात आणखी खोलवर येऊ द्या... त्यावेळी लक्षात ठेवा की तुमचे पोट थोडेसे प्रसरण होऊ द्या... आचा अर्थ श्वास हा छातीत न भरता तो पोटात भरा.... आपण चुकीची श्वसन क्रिया करत असतो... साधारणपणे श्वासोश्वास करत असतांना आपण तो श्वास छातीत भरत असतो... हे चुकीचे आहे... कधीही श्वासोश्वास करत असतांना श्वास हा पोटातच भरला गेला पाहिजे..... असो....परत श्वास बाहेर सोडा... पुन्हा घ्या.... प्रत्येक वेळी हा श्वासोश्वास पोटातच घ्या... व सोडतांना पोट स्वाभाविकपणे आत घ्या.... छातीचा पिंजरा हा खालीवर व्हायला नको.....
प्रत्येक वेळी श्वास हा शरीरात खोलवर होत असल्याची जाणिव मनाला होऊ द्या....मग हा श्वासोश्वास बेंबीपर्यंत घेण्याचा सराव करा.... पहिले चारपाच दिवस नाही जमणार... पण सवयीने आपोआपच होऊ लागेल... काही सांप्रदायात या गोष्टी शिकवल्या जातात पण हे काहीतरी गुढ आहे असे सांगत ते आपल्या मनात भ्रम निर्माण करतात.... तुम्हाला गुरु असल्याशिवाय अशा गोष्टी शिकता येणार नाहीत वगैरे सांगुन ते आणखीनच हा विषय गहन करतात.... त्यामुळे आपल्या मनाचा गोंधळ उडतो.... असो...
सुमारे दहा ते पंधरा मिनिटे ही साधना व्हायला हवी.... मन हे वर्तमानातच ठेवा व प्रत्येक श्वासाबरोबर मनाला प्रवाहित करा... श्वास हा बेंबीपर्यंत न्या.... व तसाच तो सोडा.... हळुहळु श्वास हा संथ होत असल्याचा अनुभव येईल....
या साधनेची फलश्रुति महान आहे... या साधनेने मेंदुतील अतिरिक्त उर्जा ही नाहीशी होते... मेंदुस खऱ्या अर्थाने शांती मिळते... डोके थंड रहाते.... डोळे हे तेजस्वी होतात... निद्रानाशावर तर ही साधना अमृतासमान आहे.... मला तर या साधनेने हुकमी झोप प्राप्त झाली आहे..... कधीही मी अतिशय गाढ निद्रेचा अनुभव घेऊ शकतो....ज्याचे मन सतत भुतकाळाचा व भविष्यकालाचा विचार करत असते त्यास मन हे वर्तमान काळातच असण्याचा अनुभव येईल व तो आपोआपच आनंदी राहील... त्याला मनातील विकार छळणार नाहीत.... हे मी माझ्या अनुभवाने सांगतो..... मन हे जास्त करुन भविष्याची चिंता करते..... व त्यामुळे मन सतत अस्वस्थ असते.... माझे काय होईल.... मुलाबाळांचे कसे होईल.....या विचाराने आपण चिंतीत असतो व त्यामुळे आपण आजचा वर्तमानतील आनंद हरवुन बसतो.... माझा एक ओळखीचा मित्र आहे... जेव्हा आम्ही एकत्र चहा पितो त्यावेळी याच्या मनात नेहमी घरादाराचेच विषय असतात..... बायको जेवली असेल काय.... मुले झोपली असतील काय.... उद्याचे काय होईल..... यामुळे त्याला चहा पिण्याचा आनंद कधीच मिळत नाही..... प्यायचा म्हणुन पितो...... जेवायचे म्हणुन जेवतो व जगायचे म्हणुन जगतो... याला काय अर्थ आहे... हे माझ्या मित्रांनी यावर विचार करा... आपल्या हातात आत्ताचा काळ आहे... भुतकाळ तर कधीच निघुन गेलेला असतो... व भविष्यकाळ हा यायचा असतो.... आपल्या हातात फक्त चालु वर्तमान काळच असतो.... तो देखील क्षण रुपाने.... आला क्षण गेला क्षण...व क्षण आपल्यासाठी थांबत नाही.... असे असतांना का उद्याच्या विचाराने आपण अस्वस्थ व्हायचे.... शिवाय उद्याचा काळ हा आपण आत्ताचा क्षण कशाप्रकारे व्यतित केला यावरच अवलंबुन आहे... नाही का...असो....
ही साधना तुम्ही करा व तिचा अनुभव घ्या व तुमच्या मित्रांना पण सांगा..... या साधनेचा प्रचार करा त्याचे तुम्हाला नक्किच चांगले फळ मिळेल... तुमच्या मित्रांना या आपल्या गृपमधे सामिल करुन घ्या.....
तुमच्या लाडक्या मुलांनाही ही साधना करायला सांगा... कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासात आई- वडलांचा मोठा सहभाग असतो......या साधनेची आणखी विस्तृत फलश्रुति पुढच्या भागात सांगितली जाईल.... तोपर्यंत मी आपला निरोप घेतो... जयहरि... जयहरि...... ( क्रमशः )
द्वारा.......डीसिताराम